ॲड. विश्वास शिगवण यांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी पदकांची कमाई; चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा

Gramin Varta
27 Views

चिपळूण : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फोर्थ नॅशनल बार अँड बेंच बॅडमिंटन चॅम्पियनशिप’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चिपळूणचे अ‍ॅड. विश्वास शिगवण यांनी अत्यंत लक्षवेधी कामगिरी करत दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे.

अ‍ॅड. शिगवण यांनी मेन्स सिंगल्स (वयोगट पन्नास वर्षांवरील) आणि मेन्स डबल्स (वयोगट पन्नास वर्षांवरील) या दोन्ही स्पर्धात्मक गटांमध्ये ब्राँझ पदक पटकावत देशाच्या राजधानीत चिपळूण तालुक्याचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक उंचवला आहे. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील घवघवीत यशामुळे संपूर्ण कोकण आणि क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वय हा केवळ एक आकडा असून प्रबळ जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरही उत्तुंग यश संपादन करता येते, हेच अ‍ॅड. शिगवण यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल स्थानिक बॅडमिंटन ग्रुपसह समस्त चिपळूणकर नागरिकांमार्फत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या आगामी क्रीडा वाटचालीस सर्वत्र शुभेच्छा देण्यात येत आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4685529
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *