लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने लांजा नगरपंचायत, व्यापारी संघटना लांजा तसेच हॉकर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शहरातील विविध भागांची साफसफाई करण्यात आली. स्वच्छता मोहिमेला सहकार्य करून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, गटनेता योगेश कावटकर, हॉकर्स संघटना अध्यक्ष महेश नारकर यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याने या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लांजा शहरात नगरपंचायत व हॉकर्स संघटना यांच्यावतीने स्वच्छता मोहिम
Leave a Comment






