रत्नागिरी : कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी वैशाली गोरे

Gramin Varta
94 Views

रत्नागिरी: कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या रत्नागिरी जिल्हा महिला समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली रवींद्र गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोकरे यांच्या हस्ते सौ.गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रातील गोरे यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितच लाभ होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, शैक्षणिक प्रबोधन तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच समाजातील महिलांना संघटित करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे आणि त्यांना सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेणे, या उद्देशाने महिला समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्यात येणार आहे.

Total Visitors :
4684842
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *