रत्नागिरी : आविष्कार संशोधन समितीच्या कार्यशाळेत डीजीकेचा सहभाग

Gramin Varta
59 Views

रत्नागिरी: दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालयात झालेल्या २ दिवसीय आविष्कार संशोधन कार्यशाळेत येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, आविष्कार संशोधन समितीच्या विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. मीनाक्षी गुरव, रुईया कॉलेज, मुंबई येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. सुनीता शैलजान, डॉ. शशिकांत मेनन व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालंयाचे आविष्कार समन्वयक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेत सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या सत्रांमधून आविष्कार स्पर्धेचे महत्त्व, वर्ष २०१७ ते वर्ष २०२५ पर्यंतचे विद्यापीठाला मिळालेले यश, स्पर्धेचे नियम व अटी, संशोधनाचा समाजासाठी होणारा प्रत्यक्ष उपयोग तसेच या स्पर्धेसाठी कशा प्रकारचे संशोधन प्रकल्प निवडावे व त्याचे सादरीकरण कसे करावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या आविष्कार समितीच्या प्रमुख प्रा. सानिका कीर, प्रा. सिद्धी साळवी व प्रा. आसावरी मयेकर तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी निलाक्षी राऊत, संगीता कांबळे व गौरी शिंदे उपस्थित राहिल्या.

Total Visitors :
4684841
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *