भारतीय जवानांसाठी काळबादेवीच्या विद्यार्थ्यांकडून बंधुत्वाची राखी

Gramin Varta
72 Views

जाकादेवी / संतोष पवार : भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काळबादेवी येथील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या भारतीय जवानांसाठी पाठविण्याचा  विशेष उपक्रम राबविला.

विद्यार्थ्यांनी अत्यंत ऐक्याच्या भावनेने उत्साहाने विविध आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्या पोस्टामार्फत भारतीय जवानांपर्यंत  पाठवण्यात आल्या आहेत. देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आपली कृतज्ञता आणि देशप्रेम व्यक्त केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बनपशाळेचे मुख्याध्यापक श्री.भुवड पदवीधर शिक्षक श्री. आरेकर, उपशिक्षिका श्रीम.झोरे , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. भोळे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री. व सौ. शिरधनकर आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.‌या देशभक्ती उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले.“सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनगटावर विद्यार्थ्यांच्या प्रेमाची राखी!” या भावनेतून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेसाठी अभिमानास्पद ठरला.

Total Visitors :
4703436
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *