दापोलीत सततच्या आजारपणाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
68 Views

दापोली (प्रतिनिधी): सततच्या आजारपणाला कंटाळून एका ४० वर्षीय इसमाने घरात कोणी नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दापोली बौद्धवाडी येथे घडली आहे. विश्वजित विश्वनाथ कासारे (वय ४०, रा. मौजे दापोली बौद्धवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत विश्वजित कासारे हे गेल्या काही काळापासून सतत आजारी असायचे. या वारंवार उद्भवणाऱ्या आजारपणाला ते प्रचंड कंटाळले होते. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना, त्यांनी बेडरूममधील छताच्या लोखंडी बारला कॉटनच्या ओढणीने गळफास घेतला. घरातील व्यक्ती परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मयत विश्वजित यांचे मेहुणे प्रवीण जनार्दन तांबे (वय ४८, रा. मौजे दापोली बौद्धवाडी) यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात दिली. प्रवीण तांबे यांच्या खबरीवरून पोलिसांनी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजि. नं. ५९/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. पोलीस वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ढोले (ब. नं. १३०४) यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :
4718639
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *