निर्मल ग्रामपंचायत नाणीजच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी चिराग खटकूळ यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
277 Views

रत्नागिरी :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाणीज अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी श्री. चिराग शरद खटकूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेली तहकूब सभा २३ ऑगस्ट रोजी पार पडली. या विशेष सभेत उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या एकमताने खटकूळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

चिराग खटकूळ हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत नेहमीच सक्रिय राहिले असून विविध लोकोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो. सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या रत्नागिरी दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी संघ नाणीजचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीमुळे गावातील सामाजिक सलोखा आणि विकासात्मक कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण सभेला प्रशासक विनायकजी शिवगण, उपप्रशासक नयना रेवाळे मॅडम, ग्रामसेविका सौ. मुद्राळे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विजयजी गावडे सर, दत्ताराम शिवगण, सौ. पूजा पंडित, सौ. सरफरे मॅडम, सौ. संध्या गुरव, कर्मचारी श्री. शिंदे, पोलिस पाटील नितीन कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम खावडकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष चिराग खटकूळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -
Total Visitors :
4750429
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *