५० व्या वाढदिवशी चिपळूण मधील सायकल स्वार मावळ्याची ऐतिहासिक मोहीम : चिपळूणचा हेमंत भोसले आग्रा ते राजगड सायकल मोहिमेवर

Gramin Varta
31 Views

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘आग्र्याहून सुटके’च्या मार्गावर चिपळूणच्या एका मावळ्याने सायकल मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रवास त्यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे.

हेमंत यशवंत भोसले (रा. चिपळूण) असे या धाडसी सायकलपटूचे नाव आहे. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९७६ रोजी चिपळूण येथे झाला. येत्या २३ ऑगस्ट रोजी ते ५० वर्षांचे होत आहेत. यानिमित्त त्यांनी १७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आग्रा ते राजगड असा सुमारे १४०० किमीचा सायकल प्रवास आयोजित केला आहे. महाराजांच्या शौर्याला ही एका मावळ्याची आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

भोसले हे मूळचे मल्लखांबपटू. वयाच्या १० व्या वर्षापासून मल्लखांबची सुरुवात करून त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक व डी.बी.जे. कॉलेजचा मानाचा कडवेकर पुरस्कार पटकावला आहे. नंतर सायकलिंग क्षेत्रातही त्यांनी जिल्हास्तरावर अनेक विजेतेपदे मिळवली. कोरोनातून पुनर्जन्म मिळाल्यानंतर त्यांनी सायकलिंगला वाहून घेतले असून आतापर्यंत ३० हजार किमी सायकलिंग, सुपर रॅन्डोनियर (SR) ही पदवी आणि टूर दी हंड्रेड स्पर्धेत देशात ५ वा क्रमांक मिळवला आहे.

व्यवसायाने बसचालक असलेले भोसले आजही रोज ५० किमी सायकलिंग करतात. त्यांचा मुलगा अथर्व यानेही सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे.

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *