लांजा/अरबाज नेवरेकर:‘माझी वसुंधरा अभियान आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत लांजा नगरपंचायतीच्या वतीने लांजा-कुवे शहरातील नागरिकांसाठी ‘ईको फ्रेंडली घरगुती गणेश उत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचा संदेश आणि प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा १४ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी गणेश मूर्ती व सजावट पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक (ईको-फ्रेंडली) असणे आवश्यक असून थर्मॉकॉल, पी.ओ.पी. किंवा प्लास्टिक साहित्याच्या वापरावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच गणेश विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने करणे बंधनकारक राहील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लांजा नगरपंचायतीच्या नागरी सुविधा केंद्रातून अर्ज घेऊन तो भरलेल्या स्वरूपात सजावटीच्या फोटोसह १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयात जमा करायचा आहे. याशिवाय ९८२३४५६९८१ किंवा ९०२८७०६४९० या व्हॉट्सॲप क्रमांकावरही फोटो पाठवता येतील. नेमण्यात आलेले तपासणी पथक १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान सजावटीची प्रत्यक्ष पाहणी करेल.
स्पर्धतील विजेत्यांना प्रथम ३,३३३ रुपये, द्वितीय २,२२२ रुपये आणि तृतीय १,१११ रुपये यासह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.
लांजा-कुवे शहरातील नागरिकांनी या ईको-फ्रेंडली स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सावली कुरुप, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती मिलिंद (बाबा) लांजेकर आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी केले आहे.
लांजा नगरपंचायती तर्फे ‘ईको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’; आकर्षक पारितोषिके जिंकण्याची नागरिकांना संधी
Leave a Comment





