रत्नागिरीच्या अयान खानची तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
9 Views

जिल्हास्तरीय स्पर्धेत अयान ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

राजापूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी येथील उद्यमनगर परिसरातील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी अयान मुश्ताक खान याने सुवर्णपदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


मेडल्स स्वीकारताना अयान, सोबत प्रशिक्षक रेखा कररा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती राजापूर, राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि तायक्वांदो अकॅडमी राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

सुवर्णपदक विजेता अयान हा राम कररा आणि रेखा कररा यांच्या युवा तायक्वांदो अकॅडमीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे प्रशिक्षण घेत आहे. या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, आत्मसंरक्षण आणि शिस्तीचे धडे दिले जातात.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर नाताल, मुख्याध्यापिका सिस्टर सिल्विया आणि क्रीडाशिक्षक विनया मोरे, मुश्ताक खान, रुही खान यांनी अयानचे विशेष अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :
4843615
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *