गणेशभक्तांच्या सेवेसाठी खेडमध्ये मोफत चहा-नाश्त्याची सुविधा

Gramin Varta
162 Views

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे भाजपा युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

खेड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि उपनगरांतून कोकणातील आपल्या गावाकडे मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपा युवा मोर्चा, खेड यांच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील अपोलो टायर्स, भरणे नाका, खेड येथे मोफत चहा-नाश्त्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान गणेशभक्तांना काही काळ विश्रांती घेत चहा-नाश्ता करता यावा, या उद्देशाने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. लांबचा प्रवास, महामार्गावरील वाहतूक आणि गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा मिळावा, तसेच कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचे आपुलकीने स्वागत व्हावे, या भावनेतून भाजपा युवा मोर्चाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या सेवाभावी उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार व राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह महेश मुंडेकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत होत असून, गणेशभक्तांच्या सेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारे ठरत आहेत.

Total Visitors :
4843307
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *