हातिवले येथे मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात ते आठ जण जखमी

Gramin Varta
340 Views

राजापूर /तुषार पाचलकर: मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. महामार्गावरील डिव्हायडरवर टेम्पो ट्रॅव्हल्स आदळून हा अपघात घडला असून, यामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातातील जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हल्सला नेमका अपघात कशामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4845203
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *