रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘नीट’ परीक्षेत दैदिप्यमान यश; २८ विद्यार्थ्यांनी ओलांडला ५०० गुणांचा टप्पा

Gramin Varta
66 Views

खेड : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध केले आहे. या परीक्षेत शाळेच्या २८ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक, तर ६३ विद्यार्थ्यांनी ४०० हून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण कोकण विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी निकाल देणारी ही शाळा ठरली आहे.

परीक्षेत अनुष्का ६३९ गुण (९९.८८ पर्सेनटाईल), श्लोक हरवंदे ६२७ गुण (९९.८० पर्सेनटाईल), सिद्धी शेळके ६२० गुण (९९.७४ पर्सेनटाईल), तनिषा चव्हाण ६१३ गुण (९९.६७ पर्सेनटाईल) आणि अथर्व क्षीरसागर ६०१ गुण (९९.५१ पर्सेनटाईल) यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यासोबतच समृद्धी लवेकर, आयुष वाजे, आसावरी पाटील, मृदूल घाटे, इरा कदम, श्रेया गुरसळे, अर्जुन जाधव, इकसनूर सिंग, प्रक्षालिनी नायकवडे, तृप्ती कुळये, ध्रुव पाटील, तीर्था वैद्य, तन्मय आखाडे, ओम तोडकरी, शर्वरी घाडगे, ध्यानी पटेल, मिकदाद कालसेकर, अनुष्का जैन, अवदेशकुमार मेहता, ध्रुव साळवी, इफ्रा मसिहुद्दीन, सृष्टी तेटांबे आणि सई देशमुख या विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवून यशाची मालिका पुढे नेली आहे.

एकूण ७२० गुणांच्या या परीक्षेत २५ ते ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एम्स, केईएम, ग्रँड मेडिकल, सायन हॉस्पिटल, बी.जे. मेडिकल आणि ए.एफ.एम.सी. यांसारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. या यशासाठी त्यांना शाळेतील शिक्षक आणि परीक्षा विभागाच्या मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :
4556203
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *