उक्षी येथे उद्या होणार भव्य मोफत आरोग्य शिबिर: जिजाऊ संस्थेचा सामाजिक उपक्रम

Gramin Varta
108 Views

रत्नागिरी: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने रत्नागिरी विभागांतर्गत उक्षी येथे उद्या, शनिवार दिनांक १८ जुलै २०२६ रोजी एका विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, उक्षी नं. १ येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार असून, याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची मोफत जनरल तपासणी, रक्तदाब आणि शुगर तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन आणि आवश्यक औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, शिबिरात नेत्र तपासणीची विशेष सुविधा असून, गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, तालुकाप्रमुख मंदार नाईक आणि खालगाव विभागप्रमुख सचिन गोताड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडत आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *