देवरुख: गणेशोत्सवासाठी आलेल्या भक्तांच्या परतीसाठी देवरूख एसटी आगाराच्या ३१० बसेस विविध ठिकाणांहून धावणार आहेत.
गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात आले आहेत.
कोकण रेल्वेची तिकिटे मिळत नसल्याने या कोकणवासीयांची एसटीला पहिली पसंती असते. यावर्षी कोकणात दाखल झालेल्या गणेशभक्तांसाठी परतीच्या प्रवासासाठी जादा एसटी बसेस सोडणार आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील गणेशभक्तांसाठी परतीच्या प्रवासासाठी एकूण ३१० बसेसची सोय केली असल्याची माहिती आगारप्रमुख सौ. मधाळे यांनी दिली. देवरूख, साखरपा, संगमेश्वर व माखजन विभागातून या बसेस रवाना होणार आहेत.
येत्या २ तारखेला २१, ३ सप्टेंबरला १६६, ४ तारखेला ८९, ५ तारखेला १८, ६ व ७ तारखेला ८ गाड्या सोडण्याचे नियोजन झाले आहे.
एसटी बसेसने चांगली सोय केली असली तरी सतत कोसळणार्या पावसाने व मुंबई- महामार्गावरील खड्ड्यांनी कोकणवासीयांची परीक्षाच घेतली. तरीही भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायांची मनोभावे सेवा केली आहे.