GRAMIN SEARCH BANNER

शिक्षक पांडुरंग शेजाळ सेट परीक्षा उत्तीर्ण

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी : राज्यभरात शिक्षकांनी टेट परीक्षा देण्यावरून विविध प्रवाह पाहण्यास मिळत असतानाच सेट, नेट सारख्या अत्यल्प निकाल लागणाऱ्या परीक्षातही शिक्षक उज्ज्वल यश प्राप्त करीत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या सेट परीक्षेत जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा आगवे तर्फे फुणगूस ता.रत्नागिरी  या शाळेतील उपक्रमशील,उच्चशिक्षित असलेले शिक्षक पांडुरंग शेजाळ यानी उज्ज्वल यश मिळविले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पाञता परीक्षेत ( सेट) शिक्षणशास्ञ या विषयात त्यांनी यश संपादन केले. शिक्षक शेजाळ हे  नवोदय,शिष्यवृत्ती,नासा/इस्ञो इ.स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शन करतात.त्यांचे अनेक विद्यार्थी विविध  परीक्षांमधून निवडले गेले आहेत.त्यानी यापूर्वी डी. एड, बी. ए.(इंग्रजी),बी. ए.(इकॉनॉमिक),  बी.एस्सी. बी. एड, एम. एड. आदि पदव्या संपादन केल्या आहेत.त्यांची शिक्षणविषयी जिद्द ,आकांक्षा,मेहनत पाहून त्यांचे परिसरातून अभिनंदन पर कौतुक होत असून त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3367478
Share This Article