दापोली : तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे दापोली पोलिसांनी सुमारे चार लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अबार इस्माईल डायली (वय 32) यांच्या राहत्या घरामागील पडवीत प्लास्टिकच्या पिशवीत सुमारे ९९८ ग्रॅम चरस आढळून आले. हा माल गडद लाल–सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेष्टनात असून आत हिरव्या वेष्टनात तपकिरी रंगाच्या वासाचा पदार्थ गुंडाळलेला होता. बाहेरील वेष्टनावर इंग्रजीत “6 GOLD” अशी अक्षरे आणि कोरियन भाषेतील काही मजकूर लिहिलेला होता.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. यादव, पी.एस.आय. पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते व ढोले, कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे आणि एल.पी.सी. पाटेकर यांनी सहभाग घेतला.
दापोलीत केळशी किनाऱ्यावर अमली पदार्थ जप्त
