दापोली : तालुक्यातील जालगाव (सुतारकोंड) येथील प्रशांत प्रभाकर शिंदे (वय 40) हा तरुण 13 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबतची फिर्याद त्यांचे वडील प्रभाकर शंकर शिंदे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
प्रशांत हा “लाडघर येथे कामाला जातो” असे सांगून घरातून निघाला होता, मात्र तो परतला नाही. नातेवाईकांकडून शोध घेऊनही तो न मिळाल्याने अखेर पोलिसांत नोंद करण्यात आली. दापोली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
दापोलीतून तरुण बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू
