वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे शासकीय विश्रामगृहाशेजारी आज सकाळी मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या शॉपीचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या शॉपीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशांत यादव यांच्यासह सर्व मान्यवरांनी लिंगायत मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स सप्लायरचे सर्वोसर्वा, यादव साहेब यांचे खंदे समर्थक आणि शॉपीचालक दत्ताराम लिंगायत व त्यांच्या कुटुंबियांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन समारंभाला माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंद काका जोशी, संगमेश्वर उत्तरचे भाजप मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिजित शेट्ये, देवरुख शहर मंडल अध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप गोमाता मंडळ अध्यक्ष अविनाश गुरव, अमोल गायकर, श्री.करंबेळे गुरुजी, प्रीतम लिंगायत, संदीप वेळवणकर, श्री. युयुत्सु आर्ते, श्री. वैभव बने, श्री. तेजस शिंदे, श्री.पंढरीनाथ मोहिरे, श्री. दत्ताराम नार्वेकर, श्री.उमेश दळवी, श्री.संजय लिंगायत, श्री. रविशेठ पवार, श्री. शंकर बंडबे, श्री.सुनील गेल्ये, श्री. काशिनाथ वाजे, श्री. सुनील मोहिते, श्री. सचिन जाधव, श्री. प्रकाश जाधव, सौ. शितल करंबेळे मॅडम, शंकरशेठ लिंगायत, चिपळूण तालुका सरपंच संघटना अध्यक्ष योगेश शिर्के आदी उपस्थित होते.
देवरुखमधील या शॉपीत वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दर्जेदार उत्पादनांमुळे वाशिष्ठी डेअरीवरील विश्वास वाढत आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना या शॉपीचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.