GRAMIN SEARCH BANNER

जनहिताच्या मुद्द्यांवर भर देत सौ. दिक्षा खंडागळे यांची जोरदार मुसंडी; विकासाच्या मुद्द्यांनी वेधले मतदारांचे लक्ष

Gramin Varta
195 Views

गाव विकास समिती व आप युतीकडून राजकीय टीकाटिप्पणी न करता सुरुवातीपासूनच जनहिताचे आणि देवरुखच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी

देवरुख :- देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. केवळ राजकीय टीकाटिप्पणी न करता सुरुवातीपासूनच जनहिताचे आणि देवरुखच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे.

सध्या सौ. दिक्षा खंडागळे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, आपली विकासाची भूमिका त्या नागरिकांना समजावून सांगत आहेत. त्यांच्या या थेट संवादामुळे आणि ठोस आश्वासनांमुळे त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विकासाचा ‘देवरुख पॅटर्न’: महत्त्वाची आश्वासने
प्रचारादरम्यान सौ. खंडागळे यांनी मांडलेले मुद्दे केवळ आश्वासने नसून ती देवरुखच्या भविष्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश केला आहे:

  • पाणी आणि रस्ते: दररोज ३०० लिटर मोफत पाणी आणि खड्डेमुक्त रस्ते.
  • आरोग्य सुविधा: ‘आई बाबा आरोग्य सेवा योजना’ आणि ‘डॉ. कानिटकर आरोग्य सुविधा केंद्रा’ची उभारणी.
  • कर सवलत: घरपट्टीमध्ये १५ टक्के सवलत.
  • युवा व क्रीडा विकास: विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका आणि कांगणेवाडी येथे सुसज्ज कबड्डी स्टेडियम.
  • शेतकरी व कृषी: मोफत बियाणे योजना आणि शेती विकासावर विशेष भर.
  • पर्यटन: देवनगरी पर्यटन विकास कक्षाची स्थापना.
  • पायाभूत सुविधा: आधुनिक ड्रेनेज सिस्टीम.
  • पारदर्शक कारभार: नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी नागरिकांच्या विशेष कमिटीची स्थापना.
    सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे हे प्रश्न सोडवण्याचा संकल्प सौ. दिक्षा खंडागळे यांनी केल्यामुळे, देवरुखकरांचे लक्ष त्यांच्या उमेदवारीकडे वेधले गेले आहे. विकासाचा हा नवा दृष्टीकोन निवडणुकीच्या निकालात कितपत प्रभावी ठरेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3367002
Share This Article