GRAMIN SEARCH BANNER

खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते मौजे कारिवणे येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

Gramin Varta
357 Views

श्रीवर्धन: संदीप लाड/ श्रीवर्धन तालुक्यातील मौजे कारिवणे येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा कारिवणे गाव हा माजी सभापती बाबुराव चोरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीमय झाला आहे त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील राजकीय चित्र बदलताना दिसत आहेत .

प्रथमच गावात खा,सुनील तटकरे आल्याने बाबुराव चोरगे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी खासदार सुनील तटकरे यांना लोकमत ग्लोबलचा भारत भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे कारिवणे ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी
या  सामाजिक सभागृहाच्या माध्यमातून गावात विविध सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे ग्रामविकासाच्या दृष्टीने आणि सामाजिक ऐक्य बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम सुर्वे माजी सभापती बाबुराव चोरगे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे  सुजित
तांदळेकर मंगेश कोमनाक, महिलाअध्यक्ष सबा फिरफिरे,परशुराम अडगावले, सरपंच गिता चोरगे,उपसरपंच बबन जोशी, हिदायत कुदरते, जाफर अनवरी, मंगेश निंबरे ,ग्रामसेवक अभिजित माने,मुंबई अध्यक्ष मनोज रामाणे,स्थानिक अध्यक्ष अनंता चोरगे,किसन चोरगे,महिला अध्यक्ष लक्ष्मी चोरगे,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3371729
Share This Article