लांजा : बिबट्याच्या बछड्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला; परंतु त्यांची भेट झाली नाही. अखेर बछड्याला प्राणी संग्रहालयात सोडण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनपाल सारिक फकीर यांनी दिली. गेले.सतरा दिवस बछडा वन विभागाकडे आहे.
लांजा-पुनस रत्नागिरी मार्गावर पुनस संसारे तिठा या ठिकाणी रविवारी ८ जूनला रात्रीच्या सुमारास बिबट्याचा बछडा आढळून आला. बछडा एक महिन्याचा असून नर जातीचा आहे. त्याची काळजी घेतली जात असून, चोवीस तास डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. बछडा तंदुरुस्त असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. बछड्याच्या शोधासाठी बिबट्या मादी ज्या ठिकाणी ते सापडले त्या ठिकाणी येणार म्हणून तीनवेळा बछड्याला ठेवून मादी घेऊन जाते का, याची वाट पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला; पंरतु मादी आली नाही, त्यामुळे आता बोरिवली येथील प्राणी संग्रहालयात बछड्याला पाठवण्याबाबतची रितसर प्रक्रिया सुरू असल्याचे वनपाल फकीर यांनी सांगितले.
17 दिवसानंतरही मादीची भेट नाही, लांजातील ‘त्या’ बछड्याला प्राणी संग्रहालयात सोडणार
