GRAMIN SEARCH BANNER

गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी व्याख्यान संपन्न

Gramin Varta
45 Views

कृषी विभागाच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाविस्तार AI या शेतकरीहिताच्या उपयुक्त ॲपविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. चिपळूण तालुका उप कृषी अधिकारी श्री. अशोक जाधव हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

या व्याख्यानात जाधव सरांनी विद्यार्थ्यांना महाविस्तार AI ॲपचे विविध फायदे, शेतकऱ्यांना मिळणारी वैज्ञानिक मार्गदर्शक माहिती, पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, कीडनियोजन तसेच शासकीय योजनांची अधिकृत माहिती कशी मिळवावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच हे ॲप मोबाईलमध्ये कशाप्रकारे डाउनलोड व वापरावे याची माहिती PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.

एक सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील व घरातील शेतकरी बांधवांपर्यंत या ॲपची माहिती पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, असे आवाहनही जाधव सरांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग, उपप्राचार्य श्री. विजय चव्हाण आणि प्राचार्य श्री. राजेंद्र कुमार वारे उपस्थित होते.

Total Visitor Counter

3369942
Share This Article