तरवळ/अमित जाधव : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड या संस्थेच्या गुहागर तालुक्यातील कै.डॉ.दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली ता.गुहागर येथील शाळेमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला गुहागर तालुका संपर्क प्रमुख ओंकार तिवरेकर, करबुडे,जाकादेवी विभाग प्रमुख सचिन गोताड, मुकेश होरंबे,प्रकाश गुरव, प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग,सहाय्यक शिक्षिका वर्षा पवार, तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
शिक्षण,आरोग्य,रोजगार,महिला सक्षमीकरण,कृषी या क्षेत्रात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सक्षम करणे हे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.असे सचिन गोताड यांनी यावेळी सांगितले.तसेच संस्थेच्या कामकाजा विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी. आर्या साळवी हिने केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग यांनी आभार व्यक्त केले.