GRAMIN SEARCH BANNER

राजापूरकरांची एकच मागणी; अनुभवसंपन्न हुस्नबानू खलिफेच नगराध्यक्ष व्हाव्यात!

Gramin Varta
489 Views

राजापूर : शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांच्याशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला आणि तरुणवर्ग यानी नगराध्यक्ष पदासाठी हुस्नबानू खलिफेना पसंती दर्शवली आहे. त्यांनी केलेल्या विकास कामावर प्रेरित होऊन सध्या त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी मागणी वाढली आहे. त्यांच्या कार्यकाळातील कामे अजून लोकांना स्मरणात आहेत. मात्र सध्या राजापुरातील रस्त्यांची असलेली दयनीय अवस्था पाहता नागरिकांना खलीफेच नगराध्यक्ष पदासाठी योग्य असल्याची भावना व्यक्त होत आहे.

माजी नगराध्यक्ष हुस्न बानू खलिफे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमुळे आजही अनेकजण त्यांना शहराच्या प्रगतीचं प्रतीक मानतात. त्यांच्या काळात पिकनिक पॉईंट, रानतळे, कोंडेतड पूल, बाजारपेठ रस्ता, आणि पाण्याच्या टाकीवरील झाकणाचे काम ही महत्वाची कामे पूर्ण झाली होती. शहरातील पाण्याच्या समस्येवर दिलेला उपाय, तसेच बाजारपेठेतील माशेविक्रेत्यांना कायम ठिकाण देण्याची योजना यामुळे नागरिकांना थेट दिलासा मिळाला होता.

मागील काही वर्षांत हीच कामे रखडलेली असून, रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी, आठवडा बाजारातील अवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आता लोकांना पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वाची गरज वाटत आहे.

हुस्नबानू यांना सहा वर्षांचा विधानपरिषदेचा आमदार म्हणून अनुभव असून, शासनाच्या विविध योजनांतून निधी कसा आणायचा हे त्यांना उत्तम माहीत आहे. त्यामुळे “राजापूरच्या विकासासाठी पुन्हा मॅडमच हव्यात” असा एकमुखी सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

या पदासाठी आपण उभ्या राहाव्यात यासाठी आतापर्यंत ५०० हून अधिक नागरिकांनी फोनद्वारे संपर्क साधला, तर ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून मॅडमना विनंती केली आहे की, त्या काँग्रेस पक्षाकडून पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतराव्यात.

नागरिकांची भावना

👉 “राजापूरला अनुभवाचं नेतृत्व हवं आहे… आणि ते नेतृत्व फक्त हुस्न बानू खलिफे मॅडम देऊ शकतात!”

अनेकांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष चर्चांमध्येही आपला पाठिंबा व्यक्त करत सांगितलं आहे की, मॅडम यांच्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलला होता. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, बाजारपेठेचं नियोजन, नागरिकांशी संवाद — या सगळ्या बाबतीत त्यांनी दिलेला प्रतिसाद आजही लोक विसरलेले नाहीत.

“राजापूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणींना तत्पर प्रतिसाद देणाऱ्या नेत्याची गरज आहे, आणि ती भूमिका फक्त हुस्न बानू निभावू शकतात,” असे मत शहरातील सर्व समाजघटकांकडून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3199272
Share This Article