GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील बोर्डींग रोड येथे वीज तारेवर झाड कोसळले; अनर्थ टळला

Gramin Varta
161 Views

रत्नागिरी: रत्नागिरीतील बोर्डींग रोडवरील बीएसएनएल कार्यालयाच्या बागेतील एक जुने झाड अचानक विद्युत वाहिनीवर कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळल्याच्या धक्क्याने लाईटचा पोल (वीजेचा खांब) मोडून पडला आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला, हीच समाधानाची बाब.

दिवाळीच्या उत्सवाच्या काळात वीज खंडित झाल्यामुळे रहिवाशांना अंधारात राहण्याची वेळ आली आणि त्यांची मोठी गैरसोय झाली. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती महावितरण कंपनीला आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच, नगर परिषदेचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. दुसरीकडे, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेगाने दुरुस्तीचे काम पूर्ण करून परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला, ज्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Total Visitor Counter

3379373
Share This Article