GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: बाजारपेठेत 11 केव्ही विद्युत तार तुटून पडल्याने गोंधळ; वाहतुकीची कोंडी, वीजपुरवठा विस्कळीत

Gramin Varta
73 Views

चिपळूण: शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता भर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर, नगर परिषदेसमोर महावितरणची ११ केव्ही विद्युत तार तुटून पडल्याने काहीवेळ मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली, तसेच शहरातील वीजपुरवठाही काही तासांसाठी खंडित झाला होता.

बाजारपेठेत नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना, नगर परिषदेसमोर अचानक महावितरणची ११ केव्हीची तार तुटून खाली कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आणि इकडे-तिकडे पळू लागले. वाहनचालकांनीही तात्काळ ब्रेक लावून वाहने उभी केल्यामुळे गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती तातडीने महावितरण कार्यालयाला देण्यात आली. तत्पूर्वी, काही रिक्षाचालकांनी धाडस दाखवत ही तुटलेली तार बाजूला केली, ज्यामुळे थांबलेली वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, या घटनेमुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत झाला. तुटून पडलेल्या तारेमुळे लगेच वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे धोका होण्याची भीती नसते, असे उपस्थित वीज कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3370256
Share This Article