राजापूर : तालुक्यातील एका गावात जादूटोण्याचा रहस्यमय प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील जंगलमय भागात झाडाला लाल कापडात बांधलेले नारळ दिसून आला. तर एका निर्जनस्थळी बांगड्या, लिंबू आणि रंगीत दोरा आणि गाठोडे सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी ही विचित्र सामग्री पाहताच गावभर चर्चा रंगली नेमकं हे कोणी केलं?कुणाचं वाईट व्हावं म्हणून भानामती केली का?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी कपडे, रंगीत दोरे आणि पूजासाहित्य निर्जन ठिकाणी टाकलेले आढळल्याने अंधश्रद्धेच्या प्रकाराची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव व संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
हा प्रकार कोणत्या उद्देशाने करण्यात आला, भानामती की अंधश्रद्धा याचा शोध सुरू आहे. राजापूर परिसरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा आहे. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना अद्यापही मिळालेली नाही. हा प्रकार कुणी केला असावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजापुरात जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, बांगड्या, नारळ आणि गाठोड्यात बरंच काही, गावात भीतीचे वातावरण







