GRAMIN SEARCH BANNER

दाभोळे ग्रामपंचायतीला नवीन घंटा गाडीचे लोकार्पण; गावातील स्वच्छतेला नवे बळ

Gramin Varta
129 Views

सिकंदर फरास / दाभोळे: संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचायतीला जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 अंतर्गत नागरी सुविधा योजनेमार्फत नवीन घंटा गाडी मिळाली असून, गावातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ होणार आहे. या गाडीच्या लोकार्पणामुळे गावात स्वच्छतेच्या उपक्रमांना नवचैतन्य मिळणार आहे.

नवीन घंटा गाडीचे लोकार्पण आज दाभोळे येथे करण्यात आले. या वेळी ग्रामसेवक इंदुलकर, सरपंच श्री. राजेश रेवाळे, उपसरपंच श्री. किरण दाभोळकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे, कमलेश जोशी, महेंद्र फोंडे, दीक्षा मालप, लक्ष्मी गुरव, भावना देवळेकर, सुनीता झोरे, वैशाली दाभोळकर, विधी डांगल, क्लर्क सचिन जोशी आणि शिपाई प्रदीप कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमामुळे गावातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि “स्वच्छ दाभोळे, सुंदर दाभोळे” या संकल्पनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Total Visitor Counter

3379906
Share This Article