ग्रामीण वार्ता ची बातमी सर्वदूर पसरताच यंत्रणा कामाला, गुहागर पोलिसाची टीम, हिंगोलीतील ग्रामस्थांच्या प्रयत्नाला यश
गुहागर :- सोशल मीडियाची ताकद काय असते हे या घटनेवरून दिसून आले आहे. गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपती सण साठी मंगळवारी (२६ ऑगस्ट) निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही माहिती नातेवाईकांनी ग्रामीण वार्ता जवळ सांगितली होती त्यानंतर ग्रामीण वार्ताने ही माहिती प्रसारित करीत एक मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवला होता.
त्यानंतर सारी यंत्रणा कामाला लागली होती अखेर या शिक्षक कुटुंबाचा शोध लागला असून ते गोंदवलेकर येथील मठात असल्याचे समजले त्यांनी नातेवाईकांशी संपर्क केला असून ते सुखरूप असल्याचे दिसून येत आहे. अखेर सातारा येथील ग्रामस्थ गुहागर पोलिस आणि त्यांच्या मित्र परिवाराला यश आले आहे.हे शिक्षक कुटुंब बेपत्ता झाल्याचे कळताच हिंगोली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांनी गुहागर पोलीस यंत्रणेसह आपल्या मित्र परिवारात फोन करून शोध घेण्यासाठी आव्हान केले होते. आणि डिजिटल मीडिया वर बातमी प्रसिद्ध करण्यासाठी ग्रामीण वार्ताशी संपर्क साधला होता. या नंतर त्यांच्या या लढ्याला यश आले असून गणपतीच्या कृपेने हे शिक्षक कुटुंब सुखरूप सापडल्याचे आज सकाळी समजले आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
या कुटुंबाशी सायंकाळी पाचच्या सुमारास चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मोबाईल फोन बंद आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते, ती गाडी अथवा त्यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज (२८ ऑगस्ट) त्यांच्याशी संपर्क झाला आहे. कुटुंब सुरक्षित असल्याचे समजले असून, गावकऱ्यांसह नातेवाईकांनी दिलासा व्यक्त केला आहे. सातारा गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या मठात आहेत असे सापडले आहे
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली चिंता आता निवळली असून, चव्हाण कुटुंब सुखरूप परतल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.