GRAMIN SEARCH BANNER

लांजात सोमवारी आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार

Gramin Varta
26 Views

लांजा : शहरातील आणि विशेषता नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार सोमवार ११ ऑगस्ट दुपारी ३ वाजता गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

लांजा शहर समन्वय समितीच्या मागणीवरून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून लांजा शहर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींवर चर्चा करून त्याचे निवारण या जनता दरबारात केले जाणार आहे. तरी या जनता दरबाराला लांजा शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3369307
Share This Article