GRAMIN SEARCH BANNER

गुहागरचे सभापती प्रणव प्रमोद पोळेकर याची जि.प.च्या वित्त समितीवर निवड

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव प्रमोद पोळेकर यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे गुहागर तालुक्यासह कोंडकारुळ परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रणव पोळेकर हे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात असून पंचायत समितीच्या माध्यम ातून त्यांनी विविध विकासकामांना गती दिली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा पातळीवर ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद वित्त समिती ही आर्थिक नियोजन, निधी वाटप आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची मानली जाते. या समितीवर पोळेकर यांची निवड झाल्याने गुहागर तालुक्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षांव होत असून कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Total Visitor Counter

3440495
Share This Article