GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सकडून शेतकऱ्यांना मिळालेल्या दिवाळी बोनसमुळे दिवाळी झाली ‘गोड’ – मकबूल मुकादम

Gramin Varta
238 Views

रत्नागिरी: वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दूध उत्पादक कंपनीने आपल्या सर्व दूध विक्रेत्यांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत यंदा दिवाळीचा विशेष बोनस देऊन सन्मान केला आहे. कंपनीने दाखवलेल्या या उदारतेबद्दल, दूध विक्रेत्यांनी वाशिष्ठी मिल्कचे प्रमुख प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

कंपनीच्या या सन्मानामुळे आणि सहकार्यामुळे विक्रेत्यांना मोठे प्रोत्साहन मिळाले असून, हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी बोलताना विक्रेत्यांनी सांगितले की, वाशिष्ठी मिल्कने नेहमीच दूध विक्रेत्यांचा आदर जपला असून, त्यांच्यासोबत विश्वासाचे आणि पारदर्शक संबंध जिव्हाळ्याने जोपासले आहेत. ही बाब संपूर्ण दूध व्यवसाय क्षेत्रासाठी अतिशय अभिमानास्पद आहे.

कंपनीचे हे औदार्य स्वीकारल्यानंतर, विक्रेते श्री. मकबूल मुकादम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “आमचा व्यवसाय उत्तरोत्तर अधिक प्रगतीपथावर जावा आणि वाशिष्ठी मिल्क कंपनीला अधिकाधिक यश मिळत राहो, हीच आमची सदिच्छा आहे.” त्यांनी यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.

या निमित्ताने कंपनीने विक्रेत्यांना दिलेले दिवाळी बोनसचे तपशीलही समोर आले आहेत. श्री. मकबूल मुकादम यांना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षासाठीचा हा बोनस मिळाला आहे. यामध्ये सुरक्षित ठेव परत सन २०२३-२०२४ ची रक्कम ४९७.०० रुपये आणि दरफरक सन २०२३-२०२४ ची रक्कम ५२९.०० रुपये (म्हशीचे दूध ६९.३ लि. व गाईचे दूध ९२०.१ लि.) अशी एकूण रक्कम १,०२६ रुपये इतकी देण्यात आली आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., चिपळूण यांच्या वतीने दूध संकलन व दूध पुरवठा करणारे सर्व दूध उत्पादक आणि दूध विक्रेते यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. कंपनी आणि विक्रेते यांच्यातील हे सहकार्य आणि विश्वासाचे नाते भविष्यातही असेच अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article