GRAMIN SEARCH BANNER

पाली बसस्थानकावर प्रवाशाचा आयफोन चोरीला; सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी

Gramin Varta
259 Views

पाली (प्रतिनिधी) – येथील बसस्थानकावर एका प्रवाशाचा महागडा आयफोन १३ मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान घडली असून, चोरीचा गुन्हा पाली पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र रामचंद्र जांगळी (रा. चाफवली, ता. संगमेश्वर) हे मुंबईहून रत्नागिरीकडे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते पाली बसस्थानकावर थांबले असता, नंतर राजापूर–रत्नागिरी एस.टी. बसमध्ये चढत असताना त्यांचा निळ्या रंगाचा आयफोन १३ मोबाईल चोरीला गेला.

घटनेनंतर जांगळी यांनी पाली बसस्थानकावरील कंट्रोल रूममध्ये चौकशी केली असता, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समजले. यामुळे चोरीचा तपास अधिक कठीण झाला आहे.

Total Visitor Counter

3369376
Share This Article