GRAMIN SEARCH BANNER

खेड : खवटीनजीक अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
221 Views

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडी परिसरात रविवारी रात्री सुमारे 8.45 वाजता झालेल्या अपघातात सुरज ज्ञानेश्वर तरडे (वय 26, रा. काटवली, सातारा) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गणेश गोपाळ दळवी (रा. खवटी) या रिक्षाचालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मृताचा भाऊ शुभम ज्ञानेश्वर तरडे (वय 23, रा. काटवली, सातारा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते दोघे मिळून मोटारसायकल (क्र. एम.एच. 12 पी.पी. 9910) वरून प्रवास करत होते. खवटीजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या रिक्षा (क्र. एम.एच. 08 व्ही. 0514) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात सुरज तरडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Total Visitor Counter

3072102
Share This Article