GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू; १०८ रिक्त पदांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Gramin Varta
789 Views

रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस अधीक्षक आस्थापनेवर सन २०२४-२५ या वर्षातील १०८ पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये १०० पोलीस शिपाई व ८ चालक शिपाई अशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज बुधवारपासून भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर, शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार एकास दहा प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. लेखी परीक्षेतही किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या माहितीनुसार, भरतीबाबत सविस्तर माहिती आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा ‘https://www.google.com/search?q=policerecruitment2025.site.com‘ व ‘www.policedadm.gov.in’ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पोलीस भरतीत वयोमर्यादेत वाढ देण्यात आली असून, सन २०२२ पासून २०२५ पर्यंत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3374162
Share This Article