GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर बस स्थानकाजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
299 Views

संगमेश्वर : संगमेश्वर बस स्थानकाच्या परिसरात वडापावच्या गाडीजवळ एका ८२ वर्षीय वृद्धाला बेशुद्धावस्थेत पडलेले पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत व्यक्ती युसूफ महम्मद नेवरेकर (वय ८२, रा. कळबंस्ते मोहल्ला, ता. संगमेश्वर) असे आहे. या घटनेची खबर त्यांचे पुतणे आणि शेजारी राहणारे ताहीर कादीर नेवरेकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.

बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास युसूफ नेवरेकर हे संगमेश्वर बस स्थानकाच्या बाजूस असलेल्या वडापावच्या गाडीजवळच्या लादीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले नागरिकांना आढळले. ही माहिती मिळताच ताहीर नेवरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ताहीर नेवरेकर यांनी गावातील लोकांच्या मदतीने युसूफ नेवरेकर यांना एका खाजगी वाहनाने तातडीने उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. ३६/२०२५, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Total Visitor Counter

3366873
Share This Article