GRAMIN SEARCH BANNER

पावस-लांजा मार्गावर ट्रकचा अपघात

रत्नागिरी : पावस-लांजा मार्गावरील वीर येथे आज दुपारी सुमारे 2.30 वाजता चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. केबल टाकण्यासाठी खणलेल्या साईटपट्टीत ट्रक रुतल्याने तो एका बाजूला कलंडला. सुदैवाने चालकाने वेळेवर उडी मारल्याने गंभीर दुखापत टळली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. साईटपट्टी व्यवस्थित न बुजवल्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून, वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांत ही दुसरी घटना असून, यापूर्वी वीर गाव स्टॉपजवळ एका नर्सरीच्या मागे चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या मते, पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती आणखी खराब होत असून, साईटपट्ट्या न बुजवल्यास आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अशा अपघातांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2475244
Share This Article