चिपळूण: बुधवारी ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणचा मासिक स्नेहमेळावा संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष श्री उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.यावेळी मंचावर उपाध्यक्ष उदय वेल्हाळ, सचिव रत्नमाला कळंबटे,कोषाध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते.प्रथम बांगी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या उपस्थित सभासदांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करून आणि नंतर केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सौ.नीला पेंडसे, मंजिरी नरवणे आणि वृषाली खाडे यांनी ही जबाबदारी पार पाडली.प्रमुख आकर्षण होते संघाचे सभासद श्री शांताराम परशुराम तांबे. वय वर्ष फक्त १०१.खणखणीत आवाज, चालू शकतात, घरी स्वतःची कामे स्वतः करतात.जरा ऐकायला कमी येतं, पण ऐकू शकतात.त्यांचा मुलगा श्री प्रवीण तांबे त्यांना सुखरूप गुढे येथून गाडीने घेऊन आला.या कामी श्री नंदकुमार तांबे यांनी पुढाकार घेतला.तांबे आजोबांचं औक्षण पाच सुवासिनींनी केलं.संघाचे अध्यक्ष श्री उस्मान बांगी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .तांबे आजोबांना धोतराचे पान देऊन सौ नीला पेंडसे यांनी त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त केला.आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले,”तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे. तुम्हां सर्वांना धन्यवाद.”त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी किती कष्ट घेतले हे प्रत्यक्ष पाहिले आहे.महात्मा गांधीचा मिठाचा सत्याग्रह, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह इ.घटना अजूनही त्यांच्या लक्षात आहेत.
या कार्यक्रमाला ८० लोक उपस्थित होते.श्री.रत्नाकर थत्ते यांनी आपल्या शालेय जीवनातील कवितांचा आढावा घेतला.अपर्णा कांबळे,माधवी भागवत,प्रतिमा चितळे यांनी गाणी गायली.माधुरी मंडपे यांनी चारोळ्या ऐकवल्या. विजयालक्ष्मी भोसले यांनी नाट्यगीत सादर केले.कोजागिरी निमित्ताने सभासदांनी आपली कला सादर केली.पूरग्रस्त निधीसाठीही अनेकांनी आपले योगदान म्हणून देणगी दिली.ती यथावकाश मुख्यमंत्री निधीत जमा होईल.
नथुराम सावरटकर, सुभाष जोशी, विजय सैतवडेकर, विश्वास देवधर, प्रभाकर सुर्वे, सुमन धारप, उज्वला जोशी, धनश्री नाटुस्कर, अपर्णा कांबळे, विजय भागवत, शांताराम कदम यांनी संघाला देणगी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण कांबळे, बजरंग दाभोळे, अ. गनी वनकर, विजय बापट, सुरेश जाधव यांनी सहकार्य केले शेवटी अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






