सांगली : स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांगलीत स्वा. विनायक दामोदर सावरकर चौक नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता सिद्धी विनायक गणपती मंदिराजवळ, १०० फूट रोड, सावरकर कॉलनी, विश्वासबाग, सांगली येथे होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. आमदार सुरेश भाऊ खाडे (मिरज), मा. आमदार सुधीर दादा गाडगीळ (सांगली) तसेच मा. सत्यजम गांधी, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सावरकर प्रतिष्ठान, सांगलीतर्फे सर्व सावरकर प्रेमी व नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांगलीत ‘स्वा. विनायक दामोदर सावरकर चौक’ नामकरण सोहळा १५ ऑगस्टला
