GRAMIN SEARCH BANNER

देवळे गावात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पथदीप व रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Gramin Varta
292 Views

सिकंदर फरास / देवळे

संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील सोनारवाडी, सुतारवाडी, मानेवाडी आणि कुंभारवाडी या रस्त्यांवर आमदार किरणजी सामंत यांच्या माध्यमातून पथदीप बसविण्यात आले असून, या पथदीपांचा लोकार्पण सोहळा आमदार सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात आमदार सामंत यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. देवळे गावात रस्ते, पूल, आणि आता आधुनिक पथदीप बसवून गावाच्या विकासाला नवीन दिशा मिळाली आहे. त्याचबरोबर आमदार साहेबांनी दाभोळे जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिका देऊन तिचे लोकार्पणही याच ठिकाणी केले.

या सोहळ्याला आमदार किरण सामंत, माजी शिक्षण सभापती विलास चाळके, देवळे सरपंच विजया कोरगावकर, माजी पंचायत समिती सभापती जया माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याने, बापूशेठ शेट्ये, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. रजनी चिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सुर्वे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजूशेठ कुरूप, आरडीसीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, तसेच विलास बेर्डे, यश कोळवणकर, हेमंत शिंदे, प्रकाश चाळके, प्रसाद अपंडकर, रेश्मा परशेट्ये, प्रमिल चव्हाण, काशिनाथ सकपाळ, दाभोळे सरपंच राजेश रेवाळे, विलास सुकम, पोलिस पाटील विजित साळवी, बंड्यादादा परशेट्ये, संजय काळोखे, दिलीप शिर्के, राजेश व निलेश कोळवणकर, विजय पांचाळ, योगेश साळवी, उमेश व मयूर माने, चेतन शिंदे, निलेश करंबेळे तसेच आमदारांचे सहकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सोनारवाडी, सुतारवाडी, मानेवाडी आणि कुंभारवाडी तर्फे आमदार किरण सामंत यांचा तसेच विलासजी चाळके यांचा सत्कार करण्यात आला. पथदीप प्रकल्पात योगदान दिल्याबद्दल महावितरण शाखा पालीचे कनिष्ठ अभियंता अन्सार मुल्ला, ठेकेदार संजय शेडगे, सुपरवायझर हनुमंत गराटे, युवा कार्यकर्ते यश कोळवणकर, संदीप मांडवकर आणि महेंद्र चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुंदर समालोचन गजानन मोघे यांनी केले. संपूर्ण परिसरात या विकासकामांचे स्वागत होत असून, ग्रामस्थांनी आमदार सामंत यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

यावेळी सोनारवाडी, सुतारवाडी, मानेवाडी, कुंभारवाडी तर्फे आमदार सामंत यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर विलासजी चाळके यांचाही सन्मान करण्यात आला तसेच या कामासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला ते महावितरण शाखा पालीचे कनिष्ठ अभियंता अन्सार मुल्ला, या कामाचे ठेकेदार श्री संजय शेडगे, सुपरवायर हनुमंत गराटे, युवा कार्यकर्ता यश कोळवणकर, संदीप मांडवकर, महेंद्र चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले, गजानन मोघे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम समालोचन केले.

Total Visitor Counter

3210802
Share This Article