GRAMIN SEARCH BANNER

भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. दीप्ती महाडिक यांची निवड

Gramin Varta
259 Views

चिपळूण (प्रतिनिधी):- भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. दीप्ती महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी चिपळूण दौऱ्यावर भाजप मेळाव्याप्रसंगी दिले.

गेल्या काही वर्षांपासून खांदाट पाली येथील सौ. दीप्ती महाडिक या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गत जिल्हा परिषद निवडणुकीत पेढे गटातून निवडणूक जिंकत यश संपादन केले होते. या गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास निधी आणत प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. तर काही महिन्यांपूर्वी उद्योजक प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने दीप्ती महाडिक यांच्यावर महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी  माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वैभव खेडेकर, रामदास राणे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले आदी  मान्यवर उपस्थित होते.

या निवडीबद्दल सौ. दीप्ती महाडिक यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती जबाबदारी भाजप नेते, महिला पदाधिकारी या सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article