GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मासेमारीसाठी गेलेल्या खलाशाचा मृत्यू

Gramin Varta
240 Views

रत्नागिरी : समुद्रात मासेमारी करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने एका खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जागुराम जितुराम चौधरी (वय ४९, रा. कैलाली, नेपाळ, सध्या मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागुराम हे मिरकरवाडा जेटीवरील मच्छीमार बोटीवर खलाशाचे काम करत होते. ८ नोव्हेंबर रोजी ते मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना किनाऱ्यावर आणून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तथापि, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागुराम यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मिरकरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे

Total Visitor Counter

3392432
Share This Article