हिंदू मुस्लिम विद्यार्थांनी एकत्र येत केली पंढरीची वारी
इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी समाजाला दिला हिंदू – मुस्लिम ऐक्याचा संदेश
संगमेश्वर : तालुक्यातील नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बू.च्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या वेगळ्या वेषभूशा करत आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली.ज्या पद्धतीने पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला वारकरी गेलेत तीच विठ्ठलाची वारी टाळ-मृदंगाचा गजर करण्यात आला आज आषाढी एकादशी करण्यात आली.

समाजमध्ये एकीकडे जातीय तेढ निर्माण केली जात आहे. जाती जातील भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र आज आंबेड बू. इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी हिंदू मुस्लिम विद्यार्थांनी एकत्र करून एकतेचा संदेश दिला आहे. यावेळी शाळेच्या परिसर छोट्या वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या आवाजाने बहरून गेला. आज विद्यार्थ्याच्या या एकतेचा संदेशाचे पालन समाजातील जनता जनार्दन यांनी करण्याची गरज आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, सचिव राजेश आंबेकर, सलाउद्दीन बोट, सलीम सय्यद, मेहराज बोट, नरेश किंजले,मुख्याध्यापिका नाझीमा बांगी,उपमुख्याध्यापिका सुजेन अलजी, शिक्षक कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, आकलीमा परदेशी, अलीशा पाठणकर, समीक्षा फेपडे, विदिशा कांबळे, कुदसीया मोडक
तसेच सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.