GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मांडवीत दोन दुचाकींच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा

Gramin Varta
529 Views

रत्नागिरी : शहरातील मांडवी सदानंदवाडी परिसरात दोन दुचाकींचा जोरदार अपघात होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर दोघे तरुण जखमी झाले. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

वैभव हेमंत सुर्वे (३२, रा. मांडवी, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल (एमएच ०८ बीएच ७७२८) घेऊन मांडवी ते मिरकरवाडा असा जात होता. त्याच्यासोबत मागे दीपक जगन्नाथ शिवलकर (६०, रा. मांडवी) बसले होते. यावेळी समोरून येणाऱ्या एक्सेस दुचाकीला (एमएच ०८ बीडी ४९९१) वैभवच्या बुलेटने धडक दिली.

या अपघातात दीपक शिवलकर यांचा मृत्यू झाला असून एक्सेस दुचाकीवरील सौबान नरुद्दीन जयगडकर (२३) आणि समनून खालील मजगावकर (२५, दोघे रा. पांजरी मोहल्ला) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल वैभव सुर्वे याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3388462
Share This Article