GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : उद्यमनगर येथे रिक्षाचालकाला रॉडने मारहाण

Gramin Varta
9 Views

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर भागात एका तरुण रिक्षाचालकाला दोन तरुणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालकाच्या दोन्ही हातांवर व पायांवर लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करण्यात आली. शहरात भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी रिक्षाचालक साहिल समीर सोलकर (वय २६, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फहद मुस्ताक पाटणकर (शिवाजी नगर) आणि दुसरा आरोपी अवान मल्ला (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलकर हे त्यांच्या रिक्षा (MH-08-BC-0150) घेऊन ओसवालनगर मार्गे हयातनगर रिक्षा स्टॉपकडे जात असताना खलपे हाऊसजवळ आरोपींनी त्यांना स्कूटरवरून कट मारत पुढे गाठले. त्यानंतर रस्त्यातच शिवीगाळ करत, धमक्या दिल्या. आरोपी फहद याने “तू चंपक मैदानावर ये, मग तुला दाखवतो” अशी धमकी दिली आणि निघून गेला. मात्र काही वेळाने कबाब कॉर्नर, उदयमनगरजवळ या दोघांनी सोलकर यांच्या रिक्षा समोर स्कूटर आडवी लावून त्यांना गाडी थांबवायला भाग पाडले. वादावादी दरम्यान फहदने सोलकर यांना पाठीमागून पकडून ठेवले आणि दुसऱ्या आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फहद याने लोखंडी रॉडने दोन्ही हातांवर व दोन्ही पायाच्या ढोपरावर हल्ला केला. यात सोलकर यांना गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

2645786
Share This Article