GRAMIN SEARCH BANNER

चक्क न्यायाधीश लाचलुचपतच्या जाळ्यात, प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Gramin Varta
273 Views

मुंबई : न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात माझगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयातील लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या प्रलंबित खटल्याचा निकाल अनुकूल लावण्यासाठी न्यायाधीश काझी यांनी लिपिक वासुदेव यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी १० लाख रुपये वासुदेवसाठी आणि १५ लाख रुपये काझी यांच्यासाठी देण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने सापळा रचून चेंबूर येथे झालेल्या बैठकीदरम्यान १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक चंद्रकांत वासुदेव याला रंगेहात पकडले.

पैसे स्वीकारल्यानंतर वासुदेव यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्याशी संपर्क साधून रक्कम प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. त्यावर न्यायाधीश काझी यांनीही संमती दर्शवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लाचलुचपत विभागाने दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3376545
Share This Article