GRAMIN SEARCH BANNER

कसबा हायस्कूलच्या आशिष बालदे याची राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
83 Views

संगमेश्वर : कसबा हायस्कूलच्या आशिष बालदे याची राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा नाशिकला होणार आहे. ही निवड झाल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय-पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे १९ वर्ष वयोगटातील विभागस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयातील १९ वर्ष वयोगट विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या या संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन करून अटीतटीच्या सामन्यात विभागस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावले होते. याच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थी आशिष अनंत बालदे याची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा हिरावडी पंचवटी (नाशिक) येथील विभागीय क्रीडा संकुलात होणार आहेत.

राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धेत निवड झाल्याबद्दल आशिष अनंत बालदे या खेळाडूचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष नियाज कापडी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, सचिव सईद उपाद्ये, सहसचिव शौकतअली खलफे, खजिनदार शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य एच. जी. शेख, पर्यवेक्षक एस. ए. पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्याला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Total Visitor Counter

3366874
Share This Article