GRAMIN SEARCH BANNER

लांजा : वाकेड फाटा येथे कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Gramin Varta
308 Views

लांजा : तालुक्यातील वाकेड फाटा येथे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात पादचारी स्वप्नील गणपत बराम (वय 40, रा. वाकेड) यांचा मृत्यू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे कामानिमित्त वाटूळकडे पायी जात असताना अज्ञात कारने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3392083
Share This Article