GRAMIN SEARCH BANNER

देवरुख नगरपंचायत निवडणूक:  व्यावसायिक शेतीसाठी देवरुख मधील शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार

Gramin Varta
68 Views

सौ.दिक्षा खंडागळे यांची आणखी महत्वपूर्ण योजनेची घोषणा

देवरुख:देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी ‘गाव विकास समिती – आम आदमी पार्टी’ तर्फे सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्या सध्या देवरुख शहर व परिसरातील वाड्यांमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या प्रचार मोहिमेत सौ. खंडागळे यांनी देवरुखमधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘समृद्ध शेतकरी योजना’ राबवण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देवरुख शहर आणि सर्व वाड्यांमधील शेतकऱ्यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी दर्जेदार बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, शेतकरी समृद्ध आणि प्रगतीशील होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहकार्य पुरवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. ‘देवरुख बनवू एक नंबर’ हे उद्दिष्ट समोर ठेवत, देवरुखच्या विकासासाठी नागरिकांनी सौ दिक्षा खंडागळेयांना’प्रचंड मतांनी विजयी’ करावे, असे आवाहन डॉ.मंगेश कांगणे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3366906
Share This Article